खालापूर तालुका मधील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणारी चौक या ग्रामपंचायती मध्ये शिवसेना या पक्षाची सत्ता आहे ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे दहा पैकी दहा सदस्य व सरपंच निवडून आले या मध्ये सदस्य सुरेश घाग यांची उपसरपंच पदी बिनविरोध वर्णी लागली.सुरेश घाग हे गरीब कुटुंब मधील असून त्यांना जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांनी निवडणूक लढवण्यास ग्रामपंचायतीच तिकीट देऊन निवडून आणले.सुधीर ठोंबरे व मोतीराम ठोंबरे यांच्या आशिर्वादामुळे मी आजउपसरपंच झालो असे वक्तव्य सुरेश घाग यांनी बोलताना व्यक्त केले.सैनिकानी मला निवडून आणण्यासाठी खूप मेहनत घेतली असेही त्यांनी सांगितले सरपंच सारिका चौधरी व त्यांच्या सोबत असणाऱ्या सर्व सदस्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. निवडूनक होतच त्यांच्या नातेवाईक वं त्यांच्या चाहत्यांनी सुरेश घाग यांची चौक बाजार पेठेतून बेंजो पथक वाजत गाजत फटाका च्या अतिश बाजीत त्याची मिरवणूक त्यांच्या घरापर्यंत काढली.
