आजरा वनअधिकारी आजरा यांचे सुलगाव स्थित कार्यालय यांनी मौ.पेरणोली जंगम कक्ष क्रं. १६० मध्ये श्री. धोडिबा लहु झोरे, व श्री. जयवंत अकुंश झोरे दोघे रा. हरपवडे पैकी धनगरवाडा. ता. आजरा यांनी अलिकडच्या काळात विनापरवाना झाडे – झुडपे तोडुन जमिनिची साफसफाई करुन कुडाची कौलारु झोपडी ०२ बांधुन ( अतिक्रमण क्षेत्र १६१.१६ चौ. मी.) अतिक्रमण केले कामी वनरक्षक साळगाव यांचेमार्फत गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी या कार्यालयाकडील नोटीस दि. ०२/१२/२०१९ अन्वये श्री. धोडिबा लहु झोरे व श्री. जयवंत अकुंश झोरे यांना सदरचे अतिक्रमण स्वखर्चाने ०३ दिवसात काढुन घेणेबाबत कळविणेत आले होते. हे अतिक्रमण असल्याने वनवविभाग आजरा यांनी जे. सी. बी च्या साह्याने अतिक्रमण घरे पाडली होती. याबाबतीत झोरे. कुटुंब यांनी काँ. संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली आजरा तहसिल कार्यालयात धरने केली. ( वनविभागाने पाडलेले घरे बांधून दिलीच पाहीचे आशा घोषणा देऊन परिसर दणाणुन सोडला. ) यावेळी संपत देसाई बोलताना म्हणाले झोरे कुटुंबाची जी घरे वनविभागाने पाडली आहेत. ती पुन्हा बांधून द्यावी. व जप्त केलेले साहीत्य परत करावे. व सर्वाना समान कायदा असावा. कारण कायदा सागणारे कायद्याचे पालन करत नाहीत. यावेळी माजी. जि. प. सदस्य मणिषा गुरव माजी सभापती निवृत्ती कांबळे, नारायण भंडागे, प्रकाश मोरसकर, यावेळी यांनी मनोगते व्यक्ती केली. तहसिदार विकास अहीर, वन अधिकारी डाँ. सुनिल लाड यांच्याशी धनगर समाजातील झोरे कुटुंबाची व आंदोलकांची बैठकीत चर्चा झाली. यावेळी धनगर समाजाच्या मागण्या सर्व आंदोलकांनी माडल्या यावेळी वानअधिकारी श्री. लाड यांनी अतिक्रमणा बाबत सांगताना म्हणाले झोरे कुटुंबाना नोटीस देऊनही दिलेल्या मुदतीमध्ये अतिक्रमण काढुन न घेतलेने सदरचे अतिक्रमण काढले असुंन आपन रितसर प्रस्ताव शासनाकडे वन हक्क समिती स्थापन करुन पाठवावे व मंजुरी घ्यावी असे आजरा परिक्षेत्र वनअधिकारी कार्यलय अधिकारी डाँ. लाड यांनी सागितले. यावेळी तहसिलदार श्री. अहीरे यांनी आंदोलक व वनविभागाचे म्हणणे ऐकुन यावर चर्चा करुन वनअधिकारी यांनी केलेल्या सुचनेनुसार आपण आपले दावे शासनाकडे पाठवावे असे सागितले या बैठकीला आजरा पोलिस सहाय्यक निरिक्षक बालाजी भांगे,सम्यक विद्यार्थी आंदोलनचे जिल्हा अध्यक्ष कृष्णा भारतीय , शिवसेना ता. प्रमुख. राजेंद्र सावंत, भाजप नेते रमेश रेडेकर, गोंविद गुरव, वनविभागाचे डेळेकर, हरपवडे, पेरणोली येथील सामाजिक कार्यकर्ते चळवळीचे नेते, सामाजिक कार्यकर्ते उपस्तथित होते.
कोल्हापूर
