बातमीपत्र

कोल्हापूर गॅस सिलिंडरचा (कार्बाइड) स्फोट,एकाच मृत्यू दोघे जखमी

कोल्हापूर जिल्ह्यातीलखिंडी व्हरवडे ( ता. राधानगरी) येथे गॅस सिलिंडरचा (कार्बाइड) स्फोट झाला आहे. या स्‍फोटात सागर दिलीप करपे (वय १७) याचा मृत्यू झाला आहे. तर बाजीराव करपे, दिलीप करपे हे दोघे जखमी झाले आहेत.सकाळी साडेअकराच्या सुमारास सागर करपे जेवणाचा डबा देण्यासाठी वर्कशॉप मध्ये गेला होता. त्याचे वडील व चुलते गॅसचे काम करत होते. त्यावेळी कार्बाइड सिलिंडरचा अचानक स्फोट होऊन त्यामध्ये सागर जागीच ठार झाला. तर वडील दिलीप करपे व चुलते बाजीराव करपे जखमी झाले आहेत. घटनेची नोंद राधानगरी पोलिसांत केली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक उदय डूबल करत आहेत.


आमच्यात सामील व्हा