बातमीपत्र

परतूर तालुक्यातील आष्टी परिसरातील वाढत्या घाणीच्या साम्राज्याचा त्रास सर्व सामान्य जनतेला होत असून घाणी मुळे रोगराईत वाढ होत आहे आष्टी येथील मुख्य बाजारपेठ म्हणजे महात्मा जोतिबा फुले व्यापारी संकुलन येथील बस स्थानक,महावीर चौक,शिवाजी चौक,आझाद चौक आश्या अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य वाढत जात असून त्या कडे आष्टी ग्रामपंचायत व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे सतत व्यापाऱ्यांनी तक्रार देऊनही या घानीची कसलीही दखल घेतली जात नाही या मुळे आष्टीतील जनतेला मोठ्या प्रमाणात आरोग्यासाठी पैसे खर्च करावे लागतात आष्टी ग्रामपंचायत व प्रशासन कधी स्वच्छता अभियान राबवणार अशी व्यथा स्थानिक मांडत आहे शासनाचा स्वच्छ भारत मिशन फक्त जाहिराती साठी कागदावरच आहे का असा प्रश्न आष्टीतील जनतेला पडला आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा