<span style="\"background-color:rgb(249," 249,="" 249);="" color:rgb(3,="" 3,="" 3);="" font-family:roboto,arial,sans-serif;="" font-size:14px\"="">कोविड १९च्या महामारी पासून लोकांचे प्राण वाचवण्यासाठी रक्ताची गरज मोठया प्रमाणात लागत आहे,पण रक्त बनवता येत नाही तर ते रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून संकलित केले जाते.संपूर्ण भारतात कोरोना साथीच्या रोगामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता दिसून येत आहे ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन लायन्स क्लब, एफ.आर.डी. कमिटी यांनी वसई मध्ये महाराष्ट्र दिवस व कामगार दिवसाचे औचित्य साधून वसई,नालासोपारा आणि विरार अशा तीन ठिकाणी विविध संघटनांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले.कार्यक्रमाचे उदघाटन आय.डी.एन.लायन्स सुनील पटोडिया,मुख्य अतिथी लायन्स ख्वाजा मुद्दसिर,लायन्स अजय हवेलिया,लायन्स हेमंतराज शेठीया,लायन्स राजेश सिंह व सहाय्यक पोलीस उपायुक्त चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थित झाले.ACP चंद्रकांत जाधव साहेब यांनी रक्तदान करून कार्यक्रमाची सुरवात केली. यावेळी लायन्स क्लबस कमिटी आणि सुन्नी जामा मस्जिद ट्रस्ट च्या वतीने विकलाग व अंध कुटूंबांना राशन वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमाला विरारमधील समर्पण चॅरिटेबल ट्रस्ट,शालिभद्र मेमोरियल फाउंडेशन,सर्व गुजराती ब्राह्मण समाज,बी.ए.पी.एस.स्वामीनारायण मंदिर व गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा विरार यांनी हातभार लावला
