बातमीपत्र

बिबी ग्रामीण रुग्णालय अंतर्गत ३० ते ३५ खेडेगाव असून,हे रुग्णालय औरंगाबाद - नागपूर या महामार्गावर असल्यामुळे येथे रुग्णांची व लसी साठी इतर गावावरून येणाऱ्यांची संख्याही खूप जास्त आहे.परंतु येथे शासनाकडून लसीचा पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्यामुळे परिसरातील जनता लसीकरणापासून वंचित राहत आहे. बीबी ग्रामीण रुग्णालयात आता पर्यंत २४०० लोकांची रॅपिड टेस्ट करण्यात आली असून १ हजार ८५० रुग्ण निगेटिव्ह तर ५५० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहे.परिसरातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता लवकरात लवकर लसीकरण करणे खूप आवश्यक आहे.परंतु आज लस उपलब्ध नसल्या कारणाने येथे लसीकरण बंद आहे.काही लोकांनी घेतलेला पहिला डोस व त्यानंतर घ्यावयाचा दुसऱ्या डोस मधील जे अंतर शासनाने ठरवून दिले आहे तो सुद्धा संपून गेलेले आहे.त्यामुळे त्यांना लसीचा दुसरा डोस देणे खूप आवश्यक आहे.तरी वरिष्ठ व संबंधित अधिकाऱ्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन ग्रामीण रुग्णालयात लसीचा पुरवठा लवकरात लवकर करून,डोसची संख्या वाढवावी अशी परिसरातील नागरिक मागणी करीत आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा