बातमीपत्र

लोणार तालुक्यातील बिबी येथील जवान किशोर दत्तात्रेय काळुसे शहीद

 शहीद जवान किशोर काळूसे हे दि 4 ऑगस्ट रोजी अहमदनगर येथील मिलिट्री कॅम्प मध्ये कर्तव्य बजावत असताना दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. मृत्युसमयी त्यांचे वय 32 वर्ष होते.       शहीद जवान किशोर काळूसे हे वयाच्या 19 व्या वर्षी 2019 मध्ये सैन्यात भरती झाले होते. त्यांनी सिलिगुडी व पंजाब मधील जालंदर येथे देश सेवा केली त्यानंतर 2019 मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर येथील मिलिट्री कॅम्प मध्ये त्यांची बदली झाली. दिनांक 4 ऑगस्ट रोजी आपले कर्तव्य बजावत असताना दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शहीद जवान किशोर काळुसे हे नायब सुभेदार पदावर होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक भाऊ व एक बहीण असा आप्तपरिवार आहे. शहीद जवान किशोर काळुसे यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्या कुटुंबीयांवर, मित्र परिवारावर तसेच संपूर्ण बीबी गावावर शोककळा पसरली त्यांच्या अशा अचानक जाण्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा