बातमीपत्र

जऊळके तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी श्री क्षेत्र भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्ताने भव्य व दिव्य स्वरूपाची बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले.अनेक पंचक्रोशीतील गाडा शौकिनांनी बैलगाड्यांच्या शर्यतीसाठी आपले बैलगाडी आणून यात्रेची शोभा वाढवली.नेत्राचे पारणे फेडणारी फळी फोड बारी घाटाचा राजा म्हणून श्री.राजुशेठ वसंतराव जवळेकर माजी उपसभापतीपंचायत समिती खेड यांच्या गाड्यांनी घाटात फळी फोड करून रसिकांची मने जिंकली.गेले दोन वर्ष शासनाच्या निर्बंधामुळे बैलगाडी घाट बंद होते परंतु आता बैलगाडी चालु झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.ज्याप्रमाणे दररोज झाडावर उमलणारी फुले निरनिराळ्या फुलातील मकरंद चाखतबागडणारी फुलपाखरे काडी काडी करून आपली घरटी बनवतात त्याच प्रकारे कृषिप्रधान देशातील काळ्याआईची सेवा करणारा शेतकरी बैलांचे भाव गगनाला भिडले असताना सुद्धा एकच नाद बैलगाडा शर्यत म्हणून एक एक बैल गोळा करून समाजात आपली प्रतिष्ठा जपत आहे.त्यावेळी यात्राकमिटीचे अध्यक्ष सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाय चेअरमनतरूण कार्यकर्ते व पंचक्रोशीतील गावच्या गाडा शौकिनांनी बैलगाड्यांच्या शर्यतीचा आनंद घेऊन यात्रेची शोभा वाढवली.


आमच्यात सामील व्हा