सिंदखेडराजा तालूक्यातील मोहाडी येथे पाणी पुरवठा सूरळीत करण्यासाठी पाच वर्षापूर्वी नळयोजना मंजूर करण्यात आली होती. परंतू त्या योजनेचे काम आजही अपूर्णच असून त्या कामाची चौकशी करून दोषी व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी मोहाडी वासीयांनी मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. मोहाडी या गावची लोकसंख्या 3 हजार असून या गावासाठी 35 वर्षापूर्वी माजी आमदार तोताराम कायंदे यांनी कायम स्वरूपी पाणी पुरवठा योजना कार्यांवित केली होती.गावाची पाणी टंचाई कायम स्वरूपी मिटावी म्हणून माजी सरपंच विलास आबा रिंढे यांनी तत्कालीन आमदार डाँ राजेंद्र शिंगणे यांच्या कडून एक कोटी पंचविस लक्ष रूपयाची नळयोजना मंजूर करून घेतली.
