बातमीपत्र

अंढेरा जिह्यातील सर्वात मोठे पोलीस स्टेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक कारेगावकर यांच्या जाचाला कंटाळुन अंढेरा येथील बहुजन पञकार संघाचे तालुकाध्यक्ष व मातृभुमी,सकाळचे पञकार शे.हनिफ तसेच लोकमतचे पञकार ज्ञानेश्वर म्हस्के व सावखेड नागरे येथील मातृभुमीचे पञकार शंकर पांगरकर हे ३ पञकार दि.२८फेबुवारी २०१९ पासुन जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय बुलढाणा येथे अमरण उपोषणाला बसले होते.लोकशाही मध्ये पञकारांला चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखले जाते जर याच पञकारांवर वारंवार अन्याय होत असेल आणि त्यांना उपोषणाला बसावे लागत असेल तर सामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मांगायचा? असा प्रश उपस्थित करण्यात आला सदर उपोषणाची दखल घेत आमदार डाँ शशिकांत खेडेकर व पञकार बांधवानी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याशी चर्चा करुन मुजोर ठाणेदारावर कडक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने १ मार्च २०१९ रोजी संध्याकाळी ७ वाजता बी.बी.सातपुते मुख्य पोलीस उपअधिक्षक यांच्या उपस्थितीत तसेच रासपचे प्रदेशाध्यक्ष राजपुत साहेब,देउळगाव राजा शिवसेना विभाग प्रमुख स्वप्निल शिंदे,रासप जिल्हा अध्यक्ष सिध्दार्थ पैठणे,बसपा प्रदेश सचिव प्रभातजी खिल्लारे,बसपा जिल्हा प्रभारी मनोज इंगळे,पञकार कसीम शेख,पञकार वसिम शेख,पञकार गणेश सोळंकी,पञकार इरफान शेख,पञकार शाकीर रजा,पञकार असिम मिर्झा,अंकुश शिंदे हे उपस्थीत होते. पञकारांना शिवीगाळ करणारे मुजोर ठाणेदार यांच्यावर वरिष्ठ अधिकारी काय कार्यवाही करतात.याकडे जिह्यातील पञकारांचे बांधवाचे लक्ष लागुन आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा