सिंदखेडराजा येथील बसस्थानकाच्या परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नसल्याने सिंदखेडराजा येथील टायगर ग्रुप च्या कार्यर्त्यांनी प्रवाश्यांना दुष्काळी परिस्थितीत पिण्यासाठी शुद्ध व थंडगार पाणी मिळावे या हेतूने, आपल्या स्वखार्चेने प्रवाश्यांसाठी पाणपोई सुरू केली आहे. सिंदखेडराजा हे गावं नागपूर - मुंबई हायवेवर असल्याने सिंदखेडराजा बसस्थानकावर दिवसभर एस टी बसेसची सतत ये जा सुरू राहत असल्याने बस स्थानकावर प्रवाश्यांची प्रचंड गर्दी राहते. पाणपोई सुरू होण्या आधी प्रवाश्यांना बिस्लरी बॉटल घेतल्या शिवाय पर्याय नव्हता पण गरीब लोकांना पाणी बॉटल विकत घेणे परवडत नाही म्हणून सिंदखेडराजा येथील टायगर ग्रुपने स्वखर्चने पाणपोई सुरू करून एक आदर्श निर्माण केलं आहे. पाणपोईवर पाणी पिणाऱ्या प्रवाश्यांकडून टायगर गृपचे कैतुक होत आहे.
