साखरखेर्डा येथे १७ मे रोजी वच्छलाबाई गवई शैक्षणिक संस्थांअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या अनिकेत सैनिक स्कूलच्या वतीने वृद्धाश्रमांची स्थापना करण्यात आली.साखर खेड्यांमध्ये श्री अर्जुन गवई यांनी शैक्षणिक दालन उभे केले त्याच प्रमाणे त्यांचि आई वच्छलाबाई गवई यांचा स्मृतीदिना दिवशी वृद्धाश्रमाची स्थापना ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगीसाखरखेर्डा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री संग्राम पाटील यांनी यावेळी विस्तृत मार्गदर्शन करताना केले वृद्धाश्रम स्थापना करण्याची वेळ येऊ देऊ नका आई वडिलांचा सांभाळ करा असा सल्ला यावेळी दिला या प्रसंगी माजी सरपंच कमलाकर गवई ,बी के गवई, अशोक इंगळे, प्रा. डि.एन. पंचाळ, दर्शन गवई, सुनील रींढे, अमोल गवई.इत्यादी हजर होते.
