गाडीलोहार समाज उन्नती मंडळ कल्याण यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार २०१९ या राष्ट्रीय स्तराचा बहुमुल्य पुरस्काराने मा.सौ.सुनंदा सुनिल जावळे यांना दि.२१.०७.२०१९ रोजी सकाळी १० वाजता आचार्य अत्रे नाट्यगृह,कल्याण (प) येथे सन्मानित करण्यात आले.आदर्श महीला समाज सेविका मुंबई सर्वोत्कृष्ट कार्यकुशल व्यक्ती त्यांनी आज प्रर्यत केलेल्या कार्याची दखल घेत व त्यांनी केलेले समाजाचे ऋण जाणुन त्यांच्या हातून सतत सामाजिक,शैक्षणिक,आणि सांस्कृतिक कार्य जोपासले जावे त्यांच्या कार्याने पुढील नव्या पिढीसाठी त्या एक प्रेरणा स्त्रोत ठराव्यात याकरिता सौ.सुनंदा जावळे यांना हा पुरस्कार देऊन गैरवण्यात आले.
