खळेगाव प्रतिनिधी: लोणार तालुक्यासह संपूर्ण परिसरात अवैध्य धंद्यांना ऊत आला असून औषध,अन्न प्रशासनाने जरी गुटखा बंदीचे एल्गार हाती घेतले असले तरी मा. मंत्री महोदयांच्या तालुक्यातच अवैध गुटखा विक्रीचे मोठे जाळे परसलेले असून काही पक्षाचे कार्यकर्तेच अशी कुजबुज जनतेतून दबक्या आवाजात येत आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा बंदीचे आदेश राज्यभर असताना सिंदखेडराजा,लोणार,चिखली व बुलढाणा या तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात गुटखा निर्मिती व विक्री केली जाते व त्याचाच एक भाग म्हणून पोलीस प्रशासनाला हे कार्यकर्ते राजकीय पुढारी पोलीस अधिकाऱ्यांना दबाव आणून हा व्यवसाय सुरु राहावा या करीत पोलीस अधिकाऱ्यावर दबावतंत्राचा वापर केला जात असल्याने पोलीस प्रशासनाची गळचेपी होत असल्याचे दिसून येत आहे.गुटखा व अवैध दारू विकणारे पोलीस प्रशासनावर दबाव आणतात ज्या ठिकाणी देशी दारूचे दुकान आहे त्या ठिकाणी कोणती भूमिका घ्यायची हेच पोलिसाना काळात नसल्याचे चित्र दिसत आहे.शासनाने मागेलत्याला मागेलत्याठिकानी बस स्टॅन्ड वर देशी दारूच्या दुकानाचे परवाने दिल्याने मोयच्या प्रमाणात समाजात दारुडे निर्माण होत आहेत याला आळा घालण्याकरिता पोलिसांनी कारवाई केली असता पुन्हा राजकीय पुढारी हस्तक्षेप करुन अवैध धंदा करणाऱ्याला पाठीशी घालण्याचा राजकारण्यांचा डाव सुरु असल्याने पोलीस हतबल झाले आहेत तर अशा परिस्थितीला जबाबदार कोण असा प्रश्न जनतेतु उभाराहत आहे.
