बातमीपत्र

खळेगावमध्ये रयत क्रांती संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी राबविला ग्रामस्वच्छता अभियान


 लोणार तालुक्यातील पाच हजार लोकवस्ती असलेल्या खळेगाव येथे रयत क्रांती संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या तडफदार व कर्तव्यदक्ष जिल्हा अध्यक्ष माननीय सौ.वंदनाताई वाघ यांच्या उपस्थितीमध्ये गावातील हनुमान मंदिरापासून ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली गावातील दीडशे ते दोनशे च्यावर महिलांनी यामध्ये आपला सहभाग नोंदविला माननीय वाघ यांच्या रयत क्रांती  संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरून ग्रामस्वच्छता अभियान बेटी बचाव बेटी पढाव अभियान हागणदारी मुक्त गाव अशा विविध अभियानाद्वारे व भजनी मंडळ व स्वतः गावोगावी जाऊन कीर्तनाचा माध्यमातून रयत क्रांती च्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत असल्याचे दिसून येते स्वतः हातात झाडू घेऊन त्या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाल्याचे दिसते यावेळी गावच्या सरपंच सौ अर्चना सानप यांनी सुद्धा आपला सहभाग दाखविला यावेळी तालुका अध्यक्ष शारदावायाळ शाखा अध्यक्ष सौ.लता खंडागळे उपाध्यक्ष सो संजीवनी सरदार सौ. वर्षा इंगळे अनुसया सानप सुनंदाताई वायाळ संतोष इंगळे भागवत वायाळ विकास खंडागळे समाधान जाधव रवि सरदार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा