खळेगाव हे लोणार तालुक्यातील ४ ते ५ हजार लोकसंख्या असलेले गाव असून येथील रस्त्याचे काम गेली १५ ते २० वर्ष झालेले नाही त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे काही लोकांनी पाण्याच्या पाईप लाईन साठी देखील रस्त्यात खड्डे मारल्याने रस्ता आणखीनच खराब झाला त्यातच गेली दोन वर्ष समृद्धी महामार्गाचे काम या रस्त्याच्या जवळच सुरु असल्याने या रस्त्याच्या कामासाठीलागणारी माल वाहतूक याच रस्त्यावरून केली जात आहे त्यामुळे हा रस्ता खूपच खराब झाला असून संबंधित ठेकेदार देखील या कडे दुर्लक्ष करत आहे तरी शासनाने या सर्व प्रकारावर वेळीच पायबंद घालावा अशी मागणी जनतेतून होत आहे.
