बातमीपत्र

कोरोना सारख्या महा साथीला रोखण्यास लोणार तालुक्यातील आरौग्य विभाग,पोलिस स्टेशन,महसूल विभाग हतबल

कोरोना या रोगांच्या साथीने संपूर्ण देशातच नव्हे तर जगात थैमान घातले असून याला थांवण्यासाठी केंद्रसरकार व राज्यसरकार शर्थीचे प्रयत्न करत असून त्याला जनतेने योग्य प्रतिसाद द्यायला पाहिजे या साठी विवीध प्रकारे जनजागृती करुन त्यांना थांवण्यासाठी सरकारचे काम चालू असून या मध्ये ग्रामीण भागात कुठल्याच प्रकारची व्यवस्था करण्यात येत नाही व तसेच कुठलेच प्रयत्न केले जात नाही. तालुका वैद्कीय अधकारी नर्स,तलाठी,पोलिस प्रशासन कुठलेच सहकार्य करतांना दिसत नाही जर भविष्यात खलेगाव या गावाला धोका निर्माण झाला तर सर्वस्वी जबाबदार हे संबंधित आधकारी राहतील हे गाव 5000 लोकवसतीचे असून या गावामध्ये मुंबई,पुणे व इतर ठिकाणी जी माणसे पोटाची खळगी भरणयासाठी गेली होती ती जीव वाचवण्यासाठी गावाकडे व आपल्या आपल्या जन्मभूमी मध्ये परत येत आहे यात काही गैर नाही हा त्यांचा आधिकर आहे. या संबंधित प्रशासनाने व संबंधित अधिकऱ्याने त्यांच्या विषयी माहिती जाणून घेऊन व गावात राहून राहून विचारपूस करून त्यांना तपासणी करून घेणे सक्तीचे करायला पाहिजे पण तसे होत नसून कोणी याकडे लक्ष द्यायला तयार नाही एखाद्या प्रत्तिस्थित नागरिकाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याशी संपर्क केला असता त्यांना उडवाउडवीचे उत्तरे दिली जातात त्यामुळे न्याय तरी कोणाकडे मागवा असा प्रश्न निर्माण झाला आहे व यापुढे भविष्यात निर्माण होणाऱ्या आपत्ती ला संबंधित विभाग जबाबदार राहील. *अश्या भावना जनता बोलून दाखवत आहे.*


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा