बातमीपत्र

सावरगाव तेली येथे दिव्यांगांना सॅनिटायझर चे वाटप

खळेगाव ( ) कोरोना विषाणू पासून बचावासाठी व त्याचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दृष्टीने सावरगावतेली येथे ग्रामपंचायतच्या वतीने शनिवारी दिव्यांगांना घरोघरी जाऊन सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. यावेळी गावाचे सरपंचपती जगाराव आडे यांनी आजपर्यत गावाचे जे पथ्य पळाले त्या पेक्षाही चांगले पाळावे गावात कोणत्याही खरेदीला गेल्यावर एकमेकांपासून चार ते पाच फूट अंतरावर उभे राहावे व हे आपण गावकरी पाळत आहेत म्हणूनच गावात कोरोना नाही गावकरी व्यक्तीने दिवसातून चार ते पाच वेळा गरम पाणी प्यावावे बोलतांना नाक आणि तोंड झाकने आवश्यक आहे जास्तीत जास्त वेळ हात धुवावे व कोठेही थुंकू नये यावेळी सरपंचपती जगाराव आडे, ग्रामसेवक गायकवाड, अंगणवाडीसेविका ज्योती सौदार, शोभा चव्हाण,आशावर्कर आडे ताई, ग्रामपंचायत शिपाई संजय लांडगे इत्यादी उपस्तीत होते


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा