साखरखेर्डा ( वार्ताहर ) कोरोना , काविड १९ या संसर्गजन्य आजाराने जगात , देशात , महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे . तेवढी भयानक परिस्थिती असतांना साखरखेर्डा वासियांनी समय सुचकता आणि नियमांचे पालन केले , म्हणून आपण मुक्त जरी असलो तरी लाॅकडाऊन २ चे पालन करा कारण कोरोना मुक्तीच्या लढ्यात प्रत्येक व्यक्तीची भूमिका महत्त्वाची आहे असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील यांनी केले . २० एप्रिल रोजी साखरखेर्डा पोलीस स्टेशन मध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तींची बैठक घेण्यात आली . त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले . या . पंतप्रधान , या . मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आदेशाचे पालन आपण करीत आलो . प्रशासनाने नागरिकांना विश्वासात घेऊन कोरोनाशी लढण्यासाठी लाॅकडाऊन किती महत्त्वाचे आहे याची माहिती दिली . जनतेने चांगला प्रतिसाद दिला .सण उत्सव , ईद , जयंती हे सर्व उत्सव घरीच साजरे करुन सहकार्य केले . आज जे रुग्ण पाॅझिटीव्ह निघाले , त्यांच्यात सुधारणा झाली . कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आपणाला हे युध्द जिंकायचे आहे . रमजान महिना हा पवित्र महिना असून या महिण्यात मुस्लीम बांधव उपवास करतात . त्या दरम्यान एकमेकांना सहकार्य करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी सहकार्य करावे . जिवनाआवश्यक वस्तूंचा पुरवठा घरपोच करण्यासाठी व्यापाऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन ही भुजबळ पाटील यांनी केले . यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ विवेक काळे , उप विभागीय पोलिस अधिकारी दिलीप तडवी , जि.प. सदस्य राम जाधव, कविवर्य अजीम नवाज राही , माजी सैनिक अर्जुन गवई , प्राचार्य संतोष दसरे , माजी सभापती राजू ठोके यांनी मार्गदर्शन केले . तर बैठकिला सरपंच महेंद्र पाटील , साहेबराव काटे , रामदाससींग राजपूत , माजी सरपंच कमलाकर गवई , आदि उपस्थित होते .
साप्ताहिक बातम्या
विलवडे स्थानकात थांबा...
Sep 12, 2026
