बातमीपत्र

लोणार तालुक्यातील खळेगाव येथील विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार

खळेगावं प्रतिनिधी
\r\nखळेगांव हे लोणार तालुक्यातील 5000 लोकसंख्येच गाव असून येथे सिगल फुज योजनेच्या दोन डीपी असून दोनही अत्यंत दयनीय अवस्थेत व अतिशय कमजोर आहेत असे असताना सुद्धा अनेक वेळा गावातील प्रतिशिष्ट नागरिक सरपंच यांनी अनेक वेळा लाईन मन तसेच विधुत वितरण कंपनीच्या कार्यलयाला सूचना देऊन सुध्दा हेतू पुरस्परपणे याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते या अगोदर गावामध्ये असे अपघाताचे अनेक प्रकार झालेले असताना सुध्दा याकडे दुर्लक्ष केले गेले यामुळे डीपी शेजारील भागाला सुध्दा अनेक वेळा जीवघेण्या अपघाताचे चटके सहन करावे लागले तसेच संपूर्ण गावातील विधुत पोल वरील तार लोंबलेले आहेत.तसेच गावातील बरेचश्या तार लोकांच्या घरा वरून गेले असून या विषयी माहिती संबंधित  नागरिकांनी  विधुत वितरण कंपनीच्या कार्यलयाला माहिती देऊन देखील याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते यामुळे नागरिकांमध्ये गावात मोठा अपघात झाल्यावर विद्युत कंपनी लक्ष देणार का अशी भावना व्यक्त होत आहे गावातील दोन्ही डीपी कनेक्शन पेट्या पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आहेत यामुळे भविष्यात मोठा अपघात किंवा जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून जर दोन दिवसांच्या आत कनेक्शन पेट्या तयार केल्या नाहीत तर विद्युत  वितरण कंपनीच्या कार्यलयासमोर गावकरी आंदोलन करणार असे नागरिकांनी या वेळी कळवले. 


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा