वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या सौ सविता ताई मुंडे यांनी खळेगाव येथे अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील झालेल्या पिकांची पाहणी व व खळेगाव च्या नदीवरील पुलाची पाहणी केली असता फुलावर खड्डे पडले असून शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी व तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी या पुलावरून प्रवास करत असताना खूप त्रास सहन करावा लागत आहे व आपला जीव मुठीत धरून पुलावरून प्रवेश करावा लागत असल्यामुळे राज्य सरकारने व पालकमंत्र्यांनी पूलाची प्रत्यक्ष पाहणी करून तात्काळ आठ दिवसांमध्ये दुरूस्तीचे काम सुरू करावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी च्या व ग्रामस्थांच्या वतीने पुलावर बसून आमरण उपोषण करण्यात येईल याची सरकारने नोंद घ्यावी अशी प्रतिक्रिया सविता ताई शिवाजी मुंडे यांनी दिली आहे
याप्रसंगी गावातील साहेबराव नागरे व्यंकटराव सानप संजय नागरे उद्धव नागरे निलेश सानप सचिन सानप सुरत सानप राहुल नागरे गजानन सरदार संजय सानप सतीश नागरे व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होती
