काल सध्याकाळी दैनिक लोकमंथन बुलडाणा आवृत्ती संपादक पुरुषोत्तम बोर्डे हे रोहीनखेड येथे जात असतांना राजुर घाटात गाडी रस्त्याच्या कडेला गेली व तीन कलट्या मारुन गाडी उलटी उभी राहिली अशा अवस्थेत गाडीतील एअर बॅग मुळे कोणाला मार लागला नाही, चौघे सुखरुप बाहेर आले,गाडीचे प्रचंड नुकसान झाले, मात्र नसीब बलवत्तर म्हणून पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे, विशाल शिंगणे,ड्रायव्हर व आणखी एक जण असे चौघे सुखरुप बाहेर पडले,सदर घटनेची माहिती पुरुषोत्तम बोर्डे यांनी बुलडाणा विधानसभेचे आमदार मा संजयभाऊ गायकवाड यांना फोनवरून माहिती दिली असता त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती कळवुन लगेच जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा येथे फोन लावला व दैनिक विश्वविजेता चे संपादक चंद्रकांत बर्दे, लाॅर्ड बुद्धा टि व्ही न्युज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी दिपक मोरे,दैनिक सम्राट चे जिल्हा प्रतिनिधि बाबासाहेब जाधव यांनी तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा येथे आले व भर्ती केले,व रात्री पुरुषोत्तम बोर्डे यांना दवाखान्यातून उशीरा सुट्टी झाली आहे, सकाळी औषध उपचार घेतले,तब्बेत अतिशय व्यवस्थित आहे,म्हणून कृपया काळजी करु नये.आपल्या सर्व मीत्र मंडळी च्या सहकार्याने सगळे सुखरूप आहेत.
