बुलडाणा - शासनाकडून हमी भावाने खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे अदा करण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल. लॉट एँन्ट्रीचे काम काही एजन्सींनी अद्याप पूर्ण केले नसल्याने शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे अदा करता आले नाहीत.अशा एजन्सींना काळ्या यादीत टाकण्यात येईल. तसेच,यापुढे फार्मर प्रोड्युसर्स कंपन्यांच्यावतीने खरेदीची यंत्रणा राबविण्यात यावी,असे निर्देश कृषी व पणन राज्यमंत्री ना.सदाभाऊ खोत यांनी दि२१आँगस्ट रोजी दिले.
बुलडाणा व नांदेड जिल्ह्यात खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे प्रलंबित असल्याच्या अनुषंगाने मुंबई येथे मुख्य सचिव यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी खोत यांनी हे निर्देश दिले आहे.यावेळी उडीद व हरभरा खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे चूकारे मिळण्याबाबत चर्चा करण्यात आली.
बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव,आमदार डॉ.शशिकांत खेडेकर,सुभाष साबणे,संजय रायमूलकर,पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद संचालक तथा रयत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक, मुख्य सचिव डी.के.जैन,महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे सरव्यवस्थापक कल्याण कानडे, व्यवस्थापक रमेश ठोकरे, विदर्भ सहकारी पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक रामप्रसाद दांड तसेच शेतकरी यावेळी उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री खोत आणि मुख्य सचिव जैन यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकूण घेतले. तसेच,अधिकाऱ्यांकडून या विषयाचा आढावा घेतला.शेतकर्यानी सुद्धा आपले मत यावेळी व्यक्त केले.तुरीची लॉट एन्ट्री न केलेल्या एजन्सींचे कमीशन शेतकऱ्यांना पैसे मिळेपर्यंत रोखण्यात यावे.अशा एजन्सीला काळ्या यादीत टाकण्यात यावे.लॉट एन्ट्रीची वेबसाईट पुन्हा सुरू करण्यासाठी नाफेडला पत्राने कळविण्यात यावे.तसेच,ही एन्ट्री आता फक्त पणन महामंडळाच्यामार्फत करण्यात यावी,असेही निर्देश खोत आणि मुख्य सचिवांनी यावेळी दिले आहे.यावेळी बुलढाणा जिल्हातील चिखली,मेहकर,सिंदखेड राजा,देऊळगाव राजा येथील शेतकरी मोठ्या संस्खेने उपस्थीत होते.
