वाशीम, दि. 21 : येथील एस. एम. सी. इंग्लिश स्कूलच्या वतीने अकरा हजार रुपये मदतनिधी केरळच्या पूरग्रस्तांना पाठविण्यात आला.
विद्यार्थ्यांनी जमा केलेला हा निधी जिल्हा प्रशासनामार्फत केरळ पूरग्रस्तांना सहाय्यता म्हणून देण्यात आला. प्राचार्य मीना उबगडे, सौ. प्रणिता हरसुले, शाळेच्या विद्यार्थी परिषदेचे संजना पडवाल आणि अनुराग देशमुख यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांना हा धनादेश सुपूर्द केला.
