बातमीपत्र

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये निलेश शिंदे यांचा द्वितीय क्रमांक

मोताळा:- मोताळा येथून जवळच असलेल्या डॉ. एस.डी. पाटील कॉन्हमेंट स्कुल चिंचपूर येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. सदर विज्ञान प्रदर्शनामध्ये जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, राहेरा केंद्र- रोहिणखेड येथील शिक्षक निलेश अशोक शिंदे यांनी लोकसंख्या शिक्षण यामधील पर्यावरण संवर्धन व संरक्षण या विषयात शिक्षक साहित्य मध्ये सहभागी होऊन लोकसंख्या शिक्षण यामध्ये शिक्षक साहित्यातून द्वितीय क्रमांक पटकावला. यावेळी पर्यावरण संरक्षण व संवर्धन या विषयांतर्गत पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व होणारे परिणाम यावरील उपायोजना विविध उपक्रम साहित्याद्वारे मांडण्यात आले. प्लास्टिक मुक्त भारत होण्यासाठी काय करता येईल तसेच पृथ्वीवरील विविध प्रदूषणाचे परिणाम व उपायोजना यावेळी चित्राद्वारे दाखवण्यात आले. पर्यावरनाचा ऱ्हास टाळण्यासाठी काय उपाय योजना करण्यात येणार आहे हे सादरिकरणात होते. सायकल चालवणे, कापडी पिशव्याचा वापर करून प्लास्टिक पिशवीचा वापर बंद करणे याविषयी माहिती व साहित्य सादर करण्यात आले. सदर बक्षीस वितरण कार्यक्रमास केंद्रप्रमुख तायडे सर,अनिल चव्हाण,प्राध्यापक अनिल रिंढे, चंद्रशेखर धांडे, सरकटे सर, ग.म. वैराळकर, पी टी नाफडे, नीलिमा देशमुख, राजे भोसले, कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप आढाव, शाळेचे मुख्याध्यापक सतीश पाटील, मोहम्मद अजीज, गोपाल दिघेकर, नितीन झिने, अमर व्यवहारे उपस्थित होते. यावेळी शिक्षक निलेश शिंदे यांनी सदर यशाचे  संपूर्ण श्रेय केंद्रप्रमुख नाफडे, गटशिक्षणाधिकारी  उमाळे सर, शिक्षण विस्तार अधिकारी मोरे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी कुळकर्णी मॅडम, सहकारी शिक्षक विजय जुमडे व केंद्रातील इतर सहकारी शिक्षकांना देण्यात आले आहे तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद रायपुरे, उपाध्यक्ष प्रदीप शिरसाठ व समितीचे सर्व सदस्य व गावातील नागरिकांना देण्यात आले आहे


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा