बातमीपत्र

खळेगाव येथे बूथ केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांचा धुमाकूळ..

खळेगाव येथील बूथ क्र.175 ,176,177 उमेदवार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या फोटो,निवडणूक चिन्हा सहित दमीपत्रिका यांचा सर्रास पणे वापर करिताना दिसत होते व बूथ केंद्रा समोरील मैदानात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची दादागिरी सरार्पणे दिसून येत होती. त्याबाबतीत वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेले प्रेस मीडियाचे विभावीय अध्यक्ष पत्रकार बाबाराव मुंढे यांना बिबी पोलीस ठाण्याचे बिट जामदार श्री.शेख यांनी हाताला धरून बाहेर काढले यावरून असे दिसून आले की जामदार यांच्या आशीर्वादानेच हा गोंधळ घालत असल्याचे चित्र निर्माण झाले होते.

पोलिसांनी निपक्षपाती आपले कर्तव्य पार पडावे हि नागरिकांची अपेक्षा असताना अशा प्रकारचे चित्र पाहावयास मिळणे हे धक्कादायकच म्हणावे लागेल.अशा प्रकारे पत्रकार यांना बाहेर काढून एखांद्या पक्षाला निवडणुकीदरम्यान मदत करणाऱ्या बिट जामदार यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी पत्रकार व स्थानिकांच्या माध्यमातून केली जात आहे याची दखल बीबी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी व तात्काळ कारवाई करावीअशी अपेक्षा स्थानिक नागरी करत आहेत   


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा