बातमीपत्र

चिखली शहरातील डी.पी. रोडवरील समाज कल्याण संचालनालय म.रा.पुणे मागासवर्गिय व आर्थिकदृष्या मागासविर्गीय मुलींच्या शासकिय वसतीगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थ्यीनीने आत्महत्या केल्याची घ्टना आज दि 16 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली.       या घटनेबाबत सविस्तंर हकीकत अशी की, हिंगोली जिल्हृयातील उटी ब्रम्हचारी येथील रहिवाशी असणारी एक 22 वर्षीय युवती ही विद्यार्थ्यीनी महात्मा ज्योतीबा फुले स्कुल ऑफ नर्सिंग याठिकाणी नर्सिंगचे प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेत होती. आज दि 16 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास तिने आपल्या खेालीतील खिडकीला ओढणीच्या सहाय्यने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी वसतीगृहात राहणाऱ्या मुली तिच्या खोलीत गेल्या असता त्यांना ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यांनी तात्काळ वसतीगृहाच्या वॉर्डन स्मिता जोशी यांना कळविले. पोलीसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्येठिकाणी कुठल्याही प्रकारची सुसाईड नोट आढळून आली नसल्याचे पोलीसांनी सांगितले. याबाबत प्राथमिक माहितीनुसार काही दिवसांपुर्वी युवतीच्या मावसभावाचा अपघातात मृत्यु झाला होता त्याचा तिला जबर धक्का बसला होता. त्यामुळे ती शांत राहत होती व कोणातही मिसळत नव्हती. त्या तणावात तिने हा निर्णय घेतला असल्याचे बोलल्या जात आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा