बातमीपत्र

लोणार ते दुसरबीड या किनगाव जटु मार्गे राष्ट्रीय महामार्गाला जोडलेल्या रस्त्याचे काम उत्कृष्टरित्या पुर्ण होत आहे. मात्र हा रस्ता वाळुमाफियांंसाठी छुपा रस्ता झाल्याचे चित्र आहे. या जड वाहतुकीमुळे या मार्गावर छोटे मोठे अपघात सातत्याने होत आहेत. या मार्गावरुन चार चाकी, दुचाकी नव्हे तर टँक्टर , ट्रक ही वाहने बेभानपणे वेगाने पळवली जात आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. नुकताच हिरडव येथील युवकाचा या मार्गावर अपघात झाला. करोडो रुपये खर्च करुन केलेल्या या रस्त्यावर अपघात नियत्रंणासाठी डिव्हायडर बसवण्याची अत्यंत आवश्यकता आहे. ऐवढेच काय तर अनेक वाहनचालकांकडून सर्रासपणे नियमांची पायमल्ली तोडून दिवत्ररात्र वाहतुक होत आहे. या मार्गावर ना कुठले नियत्रंण ना कुठली चौकी ? भविष्यात या मार्गावर अपघात होऊन हा रस्ता मुत्यूंंचा सापळा होऊ नये यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असुन या रस्त्यावर डिव्हायडर बसवण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन नागरे याच्यांकडून होत आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा