खळेगांव येथील श्री ज्ञानेश्वर पंढरी चाटे यांचे (चाटे इंजीनियर्स) या नावाने त्यांनी संपुर्ण महाराष्ट्रभर साखर कारखाने उभारणी करुन नाव लौकिक तर मिळवलेच याच बरोबर सामाजिक धार्मिक उपक्रमात अग्रस्थानी राहुण सामाजिक चळवळीला योगदान दिले याचबरोबर त्यांनी आपल्या अंगणातील परसबागेत अवास्तव झाडांची लागवड न करता दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील असे फळझाडांची लागवड केली व याचबरोबर परसबागेत झाडाच्या फांद्यांना पशुपक्ष्यांसाठी धान्याची व पाण्याची कुंडी म्हणजेच मुठभर धान्य घोटभर पाणी अशी व्यवस्था करुन पशु पक्षाप्रती आपली सामाजीक बांधिलकी जोपासली.
