बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील पांगरी काटे येथे प्रीतम उर्फ राहुल प्रभाकर वाघमारे व शुभांगी सुभाष वाहूळे यांचा मंगल परिणय सोहळा दिनांक 19 मे रविवार रोजी आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्रथमच सामाजिक बांधिलकी जोपासत मंगल परिणय सोहळ्या प्रसंगी रक्तदान व नेत्र तपासणी शिबीरचा आगळावेगळा कार्यक्रम पार पडला.विवाह सोहळ्या प्रसंगी वर-वधू प्रीतम ऊर्फ राहूल व शुभांगी यांनी तरूणांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्याला तरूणानी सुध्दा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन रक्तदान केले. त्याचबरोबर भव्य नेत्र तपासणी शिबीराचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. खरोखरच या नवदांपत्याचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे. या विवाहाच आदर्श समाजाने घेऊन असा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणे ही काळाची गरज आहे. जिल्ह्य़ांमध्ये प्रथमच हा आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला त्याचा आदर्श घ्यावा तेवढा कमीच आहे. हा संपूर्ण देशासाठी एक आगळावेगळा संदेश आहे.
