बातमीपत्र

बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात तीन वैद्यकीय अधिकारी व एक वैद्यकीय अधीक्षक असे चार डॉक्टर तसेच आयुष्य विभागाचे तीन वैद्यकीय अधिकारी यांची मंजूरात असतांना सद्यस्थितीत आयुष विभागाचे दोन वैद्यकीय अधिकारी यांच्यावरच रुग्णालयाचा कारभार चालत आहे. परंतु त्यांना रुग्णाना सेवा देताना काही मर्यादा येतात त्यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळत नाही. बिबी येथील ग्रामीण रुग्णालय हे मुंबई ते नागपूर या महामार्गावर असल्याकारणाने येथे परिसरातून असंख्य रुग्णांची ये-जा असते. अनेक वेळा अपघात झालेले रुग्ण, सर्प दंश व विष प्राशन केलेले तसेच आत्महत्या केलेले रुग्ण शवविच्छेदनासाठी या दवाखान्यात येत असतात. परंतु रुग्णालयात डॉक्टर नसल्याने शवविच्छेदनासाठी आलेली मृत व्यक्तीचे प्रेत आठ - आठ तास येथे पडून राहते. तालुक्यावरून डॉक्टर येईपर्यंत दरम्यानच्या काळात मृतदेहाची अवहेलना होऊन नातेवाईकांना नहाक त्रास सहन करावा लागतो. या गंभीर बाबीची प्रशासनाने दखल घेऊन येथे कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध करून देण्यात यावे.अशा आशयाचे निवेदन बीबी येथील लोकप्रतिनिधी व नागरिकांनी रुग्णालयाच्या आयुष विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ विवेक बंगाळे यांच्या मार्फत आरोग्य उपसंचालक अकोला यांना दिले


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा