डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना घडविण्यासाठी रामजीबाबा सपकाळ यांनी जशी शिस्त लावली त्याचप्रमाणे पालकांनी आपल्या मुलांना घडविण्यासाठी अभ्यासाची शिस्त लावावी. कारण ज्यांना शिक्षणाची संधी नाकारली तेच बाबासाहेब आज विद्वत्तेचे सिंम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ओळखले जातात असे प्रतिपादन सह सचिव सिद्धार्थ खरात यांनी केले.यावेळी आंबेडकर नायक पुरस्कारप्राप्त रवि खिल्लारे,निखिल अडसुळे व प्राचार्य डॉ.गोविंद गायकी यांना सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देवून विशेष सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रम प्रसंगी माजी सनदी अधिकारी आर.के.गायकवाड, ज्येष्ठ विचारवंत अशोक सोनवणे, सहसचिव सिद्धार्थ खरात, प्राचार्य डॉ.निलेश गावंडे, ज्येष्ठ समाजसेवक लक्ष्मणदादा घुमरे, अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष इंजि.डी.टी.शिपणे, जिल्हा फिल्ड ऑफीसर दिलीप लहाने, विदर्भ कोकण बँकेचे शाखा व्यवस्थापक विजय गजभिये, शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. हर्षानंद खोब्रागडे,दंत शल्य चिकित्सक डॉ.कैलास गवई आदींची प्रमुख उपस्थिती होती. सुत्रसंचालन कवयत्री डॉ.मंजुश्री खोब्रागडे यांनी तर आभार प्रदर्शन पुरुषोत्तम बोर्डे यांनी केले.
