शिंदी येथे गट ग्रामपंचायत ब्राम्हण चिकना यांनी 9 ऑक्टोबर 2010 च्या ग्रामसभे नुसार गट नंबर 253 मध्ये ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जागेवर 22 बाय 42 मीटर जागा ग्रामसभेने पंचशील ध्वज लावण्यासाठी आरक्षित केली होती. तेव्हापासून शिंदी येथील बौद्ध बांधव ध्वजाखाली विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करतात. तसेच त्या जागेला तार कुंपन सुद्धा करण्यात आले आहे. परंतु गावातील काही लोकांनी त्या परिसरात आपला केरकचरा, शेण, दगड-विटा इत्यादी साहित्य टाकून ही जागा दूषित करत अतिक्रमण केले आहे. याबाबत ग्रामपंचायतला वेळोवेळी सूचना दिली मात्र त्यावर ग्रामपंचायतीने कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे हे अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे, या मागणीसाठी शिंदी येथील असंख्य महिला व पुरुषानी उपोषणास करत येथील अतिक्रमण न हटविल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
