खळेगाव हे लोणार तालुक्यातील असून केंद्र शासनाने विकासाचा मार्ग गतिमान व्हावा व सर्वसामान्य जनतेचा विकास व्हावा या करीत समृद्धी महामार्ग सुरु केला परंतु खळेगाव येथे कामसुरू असताना ठेकेदार व त्याची माणसे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा कोणताही मोबदला न मिळालेला असताना शेतकऱ्याची जमीन जबरदस्ती बळकावत आहेत व शेतकऱ्याला दादागिरी करून मारझोड करून रस्त्याचे काम या ठिकाणी सुरु आहे ज्यांना शेतीचे पैसे शासनाकडून मिळाले नाहीत त्याच्या शेतात रस्त्याचे काम करणारे ठेकेदार शेख नौशाद व त्याचे साथीदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मारहाण केलेल्या शेतकरी कुटुंबाकडून केली जात आहे.
